वेळेची किंमत !
.by संजय कुलकर्णी.
एका वर्षाची किंमत विचारा...
नापास होणार्या विद्यार्थ्याला !
एका महिन्याची किंमत विचारा...
पेन्शनची वाट पाहणार्या पेन्शनरला !
एका आठवड्याची किंमत विचारा...
एका साप्ताहिकाच्या संपादकाला !
एका दिवसाची किंमत विचारा...
रोजंदारीवर काम करणार्या मजुराला !
एका तासाची किंमत विचारा...
प्रेयसीची वाट पाहणार्या प्रियकराला !
एका मिनिटाची किंमत विचारा...
ट्रेन चुकलेल्या प्रवाश्याला !
एका सेकंदाची किंमत विचारा...
नुकत्याच अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला !
एका क्षणाची किंमत विचारा...
गोल्ड मेडल हुकलेल्या ओलिंपिक खेळाडूला !
वेळ निघून गेल्यावर वेळेची किंमत समजते...
वेळेची किंमत आयुष्यात न जाणणार्याला... !!!
संतोष जी ,
ReplyDeleteहि कविता तुम्हाला आवडली
हे पाहून खुप आनंद झाला !
मनापासून धन्यवाद !!
खुप छान सर 👌👌
ReplyDelete