ठाण्याच्या आदिवासी भागातील शिक्षणतज्ज्ञ नीलेश निमकर यांना
महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार
क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ( क्वेस्ट ) या संस्थेचे विश्वस्त आणि संचालक नीलेश निमकर यांना नुकताच महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘ युवा कार्यकर्ता पुरस्कार ’ जाहीर झाला . ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विभागात श्री . निमकर यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असून पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . नीलेश निमकर आणि त्यांच्या काही समविचारी सहकाऱ्यांनी एकत्र येऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी २००७ साली क्वेस्ट या संस्थेची स्थापना केली . नीलेश निमकर हे गेली पंधरा वर्षे शालेय स्तरावर शिक्षणक्षेत्रातील मूलभूत बदलांसाठी अभ्यास व संशोधनाची कास धरून कार्यरत आहेत . त्यांच्या या अभ्यासपूर्ण प्रयत्नांना रतन टाटा ट्रस्टसारख्या सन्माननीय संस्थांनीदेखील सहकार्य करुन कार्यविस्तारास पाठबळ दिले आहे . एकूणच प्राथमिक शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी नवशिक्षणपद्धती , जागतिक स्तरावर चाललेले संशोधन , विचार यांचा मेळ घालून क्वेस्ट परिवर्तनशील राहिले आहे . शासनातर्फे शिक्षणाच्या हक्कासंबंधी कायदा झाल्यामुळे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची यंत्रणा निर्माण करतानाच त्याच्या गुणवत्तेकडेही लक्ष देण्याची गरज आहे अशी क्वेस्टची धारणा आहे .
क्वेस्ट संस्थेविषयी :
‘ क्वेस्ट ’ चे कार्य प्रामुख्यानेत पूर्व प्राथमिक शिक्षण , प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात चालते . ठाणे जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील बारा गावांमध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव तालुक्यात नऊ ठिकाणी इ . पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना भाषा व गणित शिकवण्यासाठी क्वेस्टतर्फे पूरक वर्ग - म्हणजेच ‘ बालभवन ’ - चालवले जातात . बालभवनात शिक्षक म्हणून गावातील स्थानिक युवकांची खास प्रशिक्षण देऊन नेमणूक करण्यात येते . भाषा शिक्षणासाठी नीलेश निमकर यांनी बनवलेल्या ‘ माझे पुस्तक ’ या विशेष पुस्तकमालेचा वापर करून विविध कृतींतून शिक्षण दिले जाते . आरंभिक वाचन - लेखनावर कोणकोणते घटक कसा परिणाम करतात याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचा प्रयत्नही या उपक्रमात करण्यात येत आहे . याशिवाय अंगणवाडीतील मुलांची लिहिण्या - वाचण्याची पूर्वतयारी व्हावी म्हणून त्यांच्यासोबतही विविध खेळ आणि कृती घेतल्या जातात . क्वेस्टचे हे काम एकट्या वाडा तालुक्यातच आतापर्यंत जवळपास सातशे विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहे . गेल्या तीन वर्षांत क्वेस्टच्या बालभवनांतील विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित आकलनामध्ये आणि त्यांना मिळणार् या गुणांमध्ये चांगलीच प्रगती दिसून आली आहे .
याशिवाय संस्थेने वाडा तालुक्यातील सोनाळे या गावात ‘ सरस्वती साधन केंद्र ’ स्थापन केले आहे . या ‘ रिसोर्स सेंटर ’ मध्ये अनेक पुस्तके आणि विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहे . येथे इ . पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ उपचारात्मक गणित कार्यक्रम ’ चालवला जातो आणि विज्ञान खेळणी बनवायचा उपक्रमही घेतला जातो . जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ या सर्वांसाठी इथले वाचनालय खुले आहे . शिक्षकांची गटसंमेलने आणि शैक्षणिक सहलींसाठीही ही जागा उपलब्ध करून देण्याचा क्वेस्टचा मानस आहे .
ग्रामीण भागातील मुलांसाठी क्वेस्टचे आणखी खास उपक्रम म्हणजे क्रीडा शिबिर आणि ग्रामीण कलाशिक्षण कार्यक्रम . शारीरिक शिक्षण आणि कला आस्वाद यांच्या संधी ग्रामीण भागात अभावानेच आढळतात . म्हणून क्वेस्टच्या या दोन्ही उपक्रमांद्वारे मुलांपर्यंत असे शिक्षण पोचवण्याचा प्रयत्न आहे , ज्यायोगे मुलांना सर्वांगीण शिक्षण मिळू शकेल .
संस्थेतर्फे राबवण्यात येणार् या इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी एक अभ्यास मंडळही चालवले जाते . या मंडळाचे सदस्य महिन्यातून एकदा भेटतात आणि शिक्षणशास्त्र , विषयविशिष्ट अध्यापन अशा मुद्द्यांवर वाचन , सादरीकरणे आणि चर्चा करतात .
महाराष्ट्र फाउंडेशनने दिलेल्या पुरस्कारामुळे शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी आदिवासी विभागात चालणार् या या प्रयत्नांची दखल घेतली गेली आहे !
अधिक माहितीसाठी -
संस्थेचे संकेतस्थळ : http://www.quest.org.in/

http://miraghesir.webs.com/
ReplyDelete